Pune Corona Update : दिवसभरात 549 रुग्णांना डिस्चार्ज, 297 नवे कोरोनाबाधित
एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. आज दिवसभरात 297 नव्या कोरोनाबाधितांची तर 549 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे.
पुणे पालिका हद्दीत 25 कोरोनाबाधित रुग्ण तर पुण्याबाहेरील 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 395 इतकी झाली आहे. शहरात 662 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 4295 झाली आहे.
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 72 हजार 254 इतकी झाली आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 59 हजार 564 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 868 नमुने घेण्यात आले आहेत.
तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.