Pimpri News : दारू प्यायला पैसे न दिल्याने एकास बेदम मारहाण
एमपीसी न्यूज – दारू प्यायला पैसे न दिल्याने एकाला विटेने आणि हाताने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.
सुभाष विठ्ठल ठोसर (वय 52, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल विटकर (वय 30, रा. विटकरचाळ, नेहरूनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी हे विजय लष्करे यांच्या घरासमोर नेहरूनगर येथे थांबले होते. आरोपीने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी वारंवार पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून विटेने व हाताने डोक्यात मारून बघून घेण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.