Chakan News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण
एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मौजे भोसे ता. खेड येथे बुधवारी (दि.12) हि घटना घडली.
याप्रकरणी 31 वर्षीय महिलेनं शुक्रवारी (दि.14) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश नामदेव ढोरे (रा. साईनगर इंदोरी, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केले आहे. फिर्यादी यांच्या भावाच्या घरातून हे अपहरण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.