Pune News : वेश्या व्यवसायातील महिलांना शिधापत्रिका मुदत वाढवून देण्याची मागणी
एमपीसी न्यूज – वेश्या व्यवसायातील महिलांना शिधापत्रिका काढण्यासाठी दिलेली तीन दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) ने केली आहे. लोकजनशक्ती पार्टी चे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले.
अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांना, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना शिधापत्रिका काढण्यासाठी 17 ते 19 जानेवारी अशी मुदत देण्यात आलेली आहे, ती वाढवून सहा महिने करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी संजय आल्हाट, अमर पुणेकर, के सी पवार, कन्हैय्या पाटोळे, कल्पना जगताप, राहुल कुलकर्णी, बंडू वाघमारे, सचिन अहिरे उपस्थित होते.