Lonavala News : देवले पुलाजवळ टेम्पोला भीषण अपघात; 1 ठार, दोन गंभीर जखमी
एमपीसी न्यूज : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवले पुलाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो व ट्रक यांच्या भीषण अपघात झाला. यामध्ये पिकअप टेम्पो मधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना हा अपघात झाला. दोन्ही जखमींवर एक्सप्रेस वेच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये प्राथमिक उपचार करून सोमाटणे येथील पवना रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. प्रथमदर्शनी पिकअप टेम्पो ट्रकला मागून धडकून हा अपघात झाल्याचे दिसत आहे. पिकअप टेम्पोच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.