Pimple gurav News : टोळक्याकडून दोघांवर खुनी हल्ला, कोयत्याने केले वार 

एमपीसी न्यूज – चार जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार करुन खुनी हल्ला केला. नवले चौक, पिंपळे गुरव येथे शनिवारी (दि.17) रात्री 12.30 वा. ही घटना घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

शुभम सावंत (रा. दापोडी), प्रमोद भोसले, जोसेफ आणि तेजस असे गुन्हा दाखल झालेल्या चार आरोपींची नावे आहेत. रोहित डॅनियल तोरणे (वय 22, रा. पिंपळे गुरव) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित हे घरासमोर बसले होते. आरोपी दुचाकी वरुन त्याठिकाणी आले व फिर्यादी यांचा मित्र निलेश पत्री याच्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी घाबरून घरात पळत जात असताना त्यांच्यावर देखील कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच, लोखंडी फायटरने तोंडावर ठोसा मारुन दात पाडला. शरिरावर इतर ठिकाणी मारहाण करुन सिमेंटचा ब्लॉक मारला. असे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.