Vadgaon News : वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक मेडिसिन डे साजरा

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक मेडिसिन डे गुरुवारी (दि. 12) साजरा करण्यात आला.

यावेळी डॉ. मिलिंद सोनवणे यांनी न्याय वैधक शास्त्रविषयी सखोलपणे माहिती दिली. न्याय वैधक विभाग खून, गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. खून झाल्यावर मृतदेह, खून करण्यामागचा उद्देश, खून कसा झाला त्याबाबत चार पद्धतीने पंचनामा करणे, शवविच्छेदन केल्यावर त्याचा व्हिसेरा योग्य पद्धतीने देणे, व्हिसेराची दोन दिवसात रासायनिक चाचणी केलीच पाहिजे, रासायनिक चाचणी उशिरा केल्यावर तपासात अडथळा होतो, याबाबत महत्वाची माहिती दिली.

पोलीस निरीक्षक विलास भोसले म्हणाले, न्याय वैधक शास्त्र पोलिसांच्या तपासात मार्गदर्शक ठरते. डॉ. मिलिंद सोनवणे यांनी महत्वाची माहिती दिली. पोलिसांना तपासात या माहितीचा उपयोग नक्कीच होईल.

यावेळी पोलीस निरीक्षक विलास भोसले, डॉ. मिलिंद सोनवणे, डॉ. गुणेश बागडे, डॉ. पद्मवीर थोरात,  पोलीस उप निरीक्षक शीला खोत,  सहाय्यक फौजदार कैलास कदम, सुनील मगर, अमोल कसबेकर, अजित ननवरे, आशिष काळे, संजय सुपे, अमोल ननवरे, अमोल तावरे, शशिकांत खोपडे, केतकी सपकाळ, मनोज कदम, संपत वायळ, श्रीशल कंटोळी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.