Sanjay Raut : संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ

एमपीसी न्यूज – पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना गुरुवारी पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांची कोठडी वाढणार की जामीन मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असताना न्यायालयाने त्यांना आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी (Sanjay Raut) सुनावली आहे. त्यामुळे त्यांचा पुढील चार दिवसांचा मुक्कामही ईडीच्या कोठडीत असणार आहे.

 

 

दरम्यान, पत्राचाळीतील गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी त्यांना 31 जुलै रोजी ईडीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता त्यांना पुन्हा चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊतांच्या चौकशीसाठी अधिक वेळ मागत ईडीने कोठडीची मागणी केली होती.त्यानंतर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.