Punavale : भरधाव कार उलटवून दुकानात शिरवल्या प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज – भारधाव वेगतील कार पलट्या मारून थेट दुकानात शिरली. यामध्ये  दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (दि. 22) दुपारी कोयतेवस्ती, पुनावळे येथे घडली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मांगीलाल जाट (वय 32, सध्या रा. कोयतेवस्ती, पुनावळे मूळ रा. राजस्थान) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथे भरधाव कार उलटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात शिरली. यात दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

त्यावेळी तीन ते चार अल्पवयीन मुले भरधाव वेगात कार घेऊन कोयतेवस्तीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.