Pune News : वानवडीत कोसळला स्लॅब, 5 मजूर जखमी

एमपीसी न्यूज – पुण्याच्या वानवडी परिसरातील विकासनगर भागात सुरु असलेल्या भोरी समाजाचे प्रार्थंनास्थळ व व्यावसायिक इमारतीच्या बांधकामावेळी जवळपास स्लँब व आडवा बीम खाली कोसळला. याठिकाणी स्लँब भरण्याचे काम सुरु होते. यामध्ये पाच मजूर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी प्राथमिक माहिती वानवडी पोलिसांनी यावेळी सांगितली.

बाबजी इन्फ्रा या (बिल्डर)कंपनीकडून बांधकाम करण्यात येत असल्याचे समजले आहे. याठिकाणी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. काही कामगार काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत का याची शहानिशा करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.