Talegaon News : ‘एमआयएमईआर’ वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनावरील दोन दिवसीय परिषद संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ‘एमआयएमईआर’ वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय येथे नववी वार्षिक संशोधन संस्था विज्ञान परिषद नुकतीच संपन्न झाली. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी ही परिषद पार पडली. ‘कोविड -19 महामारी, मागील आढावा व पुढील दिशा’ या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या विज्ञान परिषदेस 500 पेक्षा जास्त डॉक्टरांनी सहभाग नोंदविला.

परिषदेच्या पहिल्या दिवशी माजी अधिष्ठाता केईएम आणि सायन रूग्णालय मुंबईचे डॉ. अविनाश सुपे, झेन हॉस्पिटल मुंबईचे संचालक डॉ. रॉय पाटणकर, रूबी हॉल क्लिनिक पुणे न्युरोक्रीटिकल केअर विभागप्रमुख डॉ. कपिल झिरपे, जागतिक आरोग्य संस्था उपप्रादेशिक संघाचे प्रमुख डॉ. राजीव कुमार यांनी कोविड -19 वैद्यकीय शिक्षणाच्या परिवर्तनासाठी उत्प्रेरक, कोविड- 19 सर्जनचा दृष्टीकोन, वैद्यकीय – आव्हाने पूर्ण करणे आणि कोविड- 19 महामारी – पुढे काय ? या विषयावर आपली मतं मांडली.

तसेच, ‘कोरोनाच्या प्रश्नांवर उलगडा’ या विषयांवर चर्चा सत्र घेण्यात आले यामध्ये डॉ. संजय ओक (अध्यक्ष, कोविड टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य), डॉ. मोहन आगाशे (जेष्ठ मानसोपचारतज्ञ व प्रसिद्ध अभिनेते), डॉ. वर्षा पोतदार (गटनेत्या, इंफ्लयुएंझा ग्रुप, आयसीएमआर एनआयव्ही) यांनी सहभाग घेतला.

चर्चासत्राचे सुत्रसंचलन संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास यांनी केले. संस्थेच्या कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा नागरे यांनी पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचे समारोप व आभार प्रदर्शनपर भाषण केले.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आर्मी इन्स्टिटयुट ऑफ कार्डिऑथोरेंसिक सायन्सेस, पुणेचे व्हीएसएम, डायरेक्टर कमांडंट मेजर जनरल डॉ. सुशिल कुमार झा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी 160 पेक्षा अधिक शोधनिबंध प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात आले.

शल्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन नाईक, डॉ. तुषार खाचणे, डॉ. सुषमा शर्मा, डॉ. शशांक वेदपाठक, डॉ. डी. पी. कोटनीस, डॉ संदेश गावडे, डॉ विवेक निर्मले, डॉ. संतोषकुमार राजमाणी यांनी या परिषदेच्या आयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.