Pune Crime News : कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : भरधाव वेगातील बलेनो कार ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. आठ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वानवडी तील सिक्रेट हार्ट टाऊन सोसायटी समोर हा अपघात घडला. वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी कारचालक तरुणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इलायजा सूर्यकांत भोसले (वय 30) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बेदरकारपणे बलेनो कार चालवणाऱ्या करुणा कांबळे (रा. एच बिल्डिंग, सिक्रेट हार्ट टाऊन, वानवडी) या तरुणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक अविनाश हरिदास रेडके यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी करुणा कांबळे यांनी त्यांच्या ताब्यातील बलेनो कार घाईघाईने आणि अविचाराने बेदरकारपणे चालवून दुचाकीवरील इलायजा भोसले यांना पाठीमागून दरवाजाला धडकून रस्त्यावर पाडले. यामध्ये भोसले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.