Bhosari : किरकोळ कारणावरून तरुणावर धारदार हत्याराने वार

एमपीसी न्यूजमोठमोठ्याने आरडा ओरडा करत असलेल्या तरुणाला आरडा ओरडा करण्याचा जाब विचारल्यावरून त्याने आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. कोयत्यासारख्या धारदार हत्याराने तरुणाला मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्री आठ वाजता आंबेडकर पुतळा, दापोडी येथे घडली.

सागर काकासाहेब माने (वय 23, रा. दापोडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रतिक भालेराव (वय 20, रा. दापोडी) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आरोपी प्रतिक मोठ्याने आरडाओरडा करत होता. त्यामुळे सागर यांनी त्याला ‘का मोठ्या ओरडत आहे’ असे विचारले. यावरून आरोपी प्रतिक आणि फिर्यादी सागर यांच्यात भांडण झाले. त्यानंतर प्रतिकने सागर यांना कोयत्यासारख्या धारदार हत्याराने मारून जखमी केले. तसेच प्रतिकच्या दोन साथीदारांनी हाताने मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.