Metro news : मेट्रोच्या कास्टिंग यार्डमध्ये अपघात; कामगाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या कास्टिंग यार्डमध्ये अपघात झाला. यामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (शुक्रवारी, दि. 31) सकाळी झाला.

अल्बक्ष शेख (वय 26) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरू आहे. पिंपरी चिंचवड भागातील कास्टिंग यार्ड कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ पिंपळे सौदागर येथे आहे. अल्बक्ष शेख मागील काही दिवसांपासून मेट्रोच्या कास्टिंग यार्डमध्ये काम करत होता.

शुक्रवारी सकाळी या कास्टिंग यार्डमध्ये अपघात झाला. मेट्रोचे साहित्य अंगावर पडल्याने अल्बक्ष त्याखाली आला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

याबाबत मेट्रोची बाजू जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.