23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Alandi News : आळंदीत दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणांविरोधात कारवाई

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज –  आळंदी येथे दुसऱ्या दिवशी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने फुटपाथवर व रस्त्यावरील दुकानांवर अतिक्रमणांविरोधात कारवाई केली.

 

 

नगरपरिषद चौक ते माऊली मंदिर परिसर, महाद्वार चौक ते शनी मंदिर परिसर, चाकण रस्ता भाजी मंडई ते चावडी चौक, तसेच प्रदक्षिणा रस्ता या ठिकाणी फुटपाथवर व रस्त्यावर असणाऱ्या दुकानांवर अतिक्रमणविरोधात  कारवाई करण्यात आली.

 

 

मंदिर परिसरात हार, फुले, प्रसाद तसेच इतर वारकरी व विविध साहित्य वस्तू दुकाने असल्याने, दुकानातील साहित्यांचे वस्तूंचे नुसकान होऊ नये. म्हणून तेथील दुकानदारांना ठरलेल्या सीमा रेषेच्या आत, दुकानांच्या आत साहित्य वस्तू त्वरित ठेवण्याची नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सक्त ताकीद देण्यात आली.तत्पर माऊली मंदिर परिसरातील व शनीमंदिर परिसरातील दुकानदारांनी यावेळी  स्वतःहुनच रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरवात केली. त्यामुळे जेसीबी चालकासह पालिका कर्मचाऱ्यांचे बरचसे श्रम वाचले.

 

 

या अतिक्रमण कारवाई दरम्यान यावेळी आळंदी दिघी पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आळंदी नगरपरिषदेचे अतिक्रमण विभागीय प्रमुख सचिन गायकवाड व आळंदी नगरपरिषदेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

spot_img
Latest news
Related news