Pune News : शहरात कोरोना संशयित रुग्णांसाठी वेगळ्या बेडची व्यवस्था करा

राष्ट्रवादीची आयुक्तांकडे मागणी 

पुणे, दि. ११ ( प्रतिनिधी ) :  शहरात वाढत्या कोरोना रुग्णांबरोबर कोरोना सस्पेक्टेड रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना टेस्ट रिपोर्ट येई पर्यंत त्यांना कुठल्याही दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत नाही. कोरोना टेस्ट रिपोर्ट येण्यास  २ ते ४ दिवसात लागत आहेत. यादरम्यान संशयित रुग्णांना ना घरी राहता येते ना दवाखान्यात त्यांच्यासाठी बेड उपलब्ध आहेत.

 

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा संशयित रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयात व पालिकेच्या रुग्णालयात स्वतंत्र राखीव बेड उपलब्ध  करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरात दिवसाला ५ ते  ७ हजार नवे बाधित सापडत आहेत. वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी पालिकेतर्फे हव्या तेवढ्या उपाययोजना होताना दिसत नाही.त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. शहरात बाधित रुग्णांना रेमडीसिवेर इंजेक्शन्स,ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटीलेटर बेड्स उपलब्ध होत नाहीत. कोरोना लसीचा व कोरोना टेस्ट ची तुटवडा  जाणवत आहे. अनेक रुग्ण बेड्स न मिळाल्यामुळे घरीच राहात आहेत.तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा बेड्स उपलब्ध होत नाही,त्यामुळे नाहक रुग्णांचा बळी जात आहे.

 तसेच स्वॅब टेस्ट केल्यानंतर ३ दिवसानंतर रिपोर्ट येतो व संशयित रुग्ण रिपोर्ट येईपर्यंत बाहेरच फिरत असतात किंवा घरी असल्यास त्यांच्यामुळे इतर कुटुंबियांना देखील बाधा होत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे घरातील लोकांची व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोना टेस्ट केलेल्या संशयित रुग्णांसाठी  पालिकेच्या व खाजगी रुग्णालयात स्वतंत्र बेड देण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे धुमाळ यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.