Pune Crime News : आयटीतील महिलेवर कॅब चालकाचा बलात्कार

एमपीसी न्यूज : आयटी कंपनीतील नोकरी संपल्यानंतर ओला कॅबमधून घरी निघालेल्या महिलेवर कॅब चालकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. कॅब चालकाने या महिलेला पाण्यामधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर धायरीतील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला. 4 ते 30 मार्च दरम्यान हा प्रकार घडला. 

32 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर कॅब चालक प्रमोद बाबू कनोजिया (रा. कर्वेनगर) याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला  एका आयटी कंपनीत काम करते. तर आरोपी ओला कॅब चालक आहे. 4 मार्च रोजी या महिलेने मांजरी परिसरातून घरी जाण्यासाठी कॅब बूक केली होती. कॅबमध्ये बसल्यानंतर या महिलेला तहान लागल्याने तिने आरोपीकडे पाणी मागितले होते. आरोपीने यावेळी तिला गुंगीचे औषध टाकलेले पाणी पिण्यासाठी दिले. हे पाणी पिल्यानंतर पीडित महिला बेशुद्ध झाली होती.

त्यानंतर आरोपीने तिला धायरी येथील एका लॉजवर घेऊन जात तिचे अश्लील फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला असल्याचे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सुरवातीला या महिलेने स्वारगेट पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही महिला ज्या ठिकाणाहून कॅबमध्ये बसली ते ठिकाण हडपसर पोलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.