Pune News : रस्त्याच्या वादातून तरुणाचे हात पाय बांधून मारहाण 

एमपीसी न्युज : रस्त्याच्या वादातून आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याचे हात-पाय बांधून फरफटत नेले आणि कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खांदवे नगर या ठिकाणी शनिवारी रात्री हा प्रकार घडला. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

_MPC_DIR_MPU_II

अभिजित बाळासाहेब शेजवळ (वय 27) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. संतोष शिंदे (वय 26), ओमकार खांदवे (वय 25), महादू खांदवे (वय 50) , साधू खांदवे (वय 50),  राजू खांदवे (वय 45), माया खांदवे (वय 45), निलेश खांदवे (वय 30), आणि प्रसाद देवकर (वय 29) या आठ जणांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी लोहगाव येथील खांदवे नगर परिसरात राहतात. फिर्यादी आणि आरोपी महादू खांदवे यांच्या पूर्वीपासून रस्त्याच्या कारणावरून वाद आहे. शनिवारी आरोपी हा खांदवे नगर येथील मित्राच्या घराजवळ थांबले असताना आरोपी संतोष शिंदे हा त्याच्या जवळ आला आणि ” आमच्या हद्दीत का आला ? तुझ्या भावाला आधीच खपवला आहे, तुला पण खपवाचे आहे का ?” असे बोलू त्याला शिवीगाळ करू लागला.

दरम्यान या ठिकाणी आलेल्या इतर आरोपींनी फिर्यादी यांचे हात-पाय बांधून त्यांना फरफटत ओढत नेले. तर आरोपी ओमकार खांदवे याने हातातील कोयत्याने फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी संतोष खांदवे यांनीदेखील फिर्यादीचे पाठीत लोखंडी रॉड मारला. फिर्यादीची आई भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली असता आरोपीने तिला देखील मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.