_MPC_DIR_MPU_III

Chinchwad : मतमोजणीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार विधानसभा मतदारसंघ येतात. ही मतमोजणी गुरुवारी (दि. 24) होणार आहे. त्यातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मोजणी म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी येथे होणार आहे. तर मावळची विधानसभेची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेज येथे होणार आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी येथे होणा-या मतमोजणीसाठी एक पोलीस उपआयुक्त, तीन सहाय्यक पोलीस आयुक्त, 10 पोलीस निरीक्षक, 13 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, तसेच 160 कर्मचारी, असा बंदोबस्त असणार आहे. हा बंदोबस्त स्ट्राँगरूम व परिसरासाठी असणार आहे.

तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेज येथे होणा-या मावळ विधानसभेच्या मतमोजणीसाठी एक अपर पोलीस आयुक्त, दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, 8 पोलीस निरीक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि 150 कर्मचारी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील क्रियाशील गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर, तडीपार गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मतमोजणी दरम्यान व निकालानंतर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर तपास पथके आणि गुन्हे शाखांच्या पथकांमार्फत उपद्रवी इसमांवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहेत. पोलिसांनी संवेदनशील भागात गस्त वाढवून आणि कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.

आचारसंहितेमुळे मिरवणुकांना परवानगी नाही

निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे मतमोजणीच्या निकालानंतर उमेदवारांना अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांना विजयी मिरवणुका काढण्यास पोलिसांकडून परवानगी देण्यात येणार नाही. निवडणूक मतमोजणीच्या कलानंतर व निकालानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी निकालाचा आदर करून शांतात राखून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.