Pimpri News : आयर्नमॅन कृष्णप्रकाश झाले ‘किचन कल्लाकार’; प्रजासत्ताक दिनी होणार कार्यक्रम प्रसारित 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्णप्रकाश यांची दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख आहे. प्रशासकीय सेवेसह क्रिडा क्षेत्रात देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कृष्णप्रकाश यांचे कला क्षेत्रावर देखील तेवढेच प्रेम आहे. पोलीस आयुक्तांनी नुकतेच टिव्हीवरील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. प्रजासत्ताक दिनी या कार्यक्रमाचा भाग प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे.  

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी नुकतेच या कार्यक्रमात हजेरी लावत, किचन मधील कल्लाकारी दाखवली. पोलीस आयुक्तांनी आपल्या फेसबुक अकाऊंट वरती याबाबत एक पोस्ट शेअर करत. दोन्ही हाताने किचनवरती कोणतातरी पदार्थ बनवताना दिसत आहेत.

‘तुमचे मन एक रणांगण आहे, त्याचे सेनापती व्हा, सैनिक नव्हे. दोन लोकांचे ऐकणे आणि दोन्ही हातांनी स्वयंपाक करणे, एकाच वेळी.’ असे कॅप्शन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी कार्यक्रमादरम्यानच्या काढलेल्या फोटोसोबत दिले आहे. फेसबुक वरती अनेकांनी पोलीस आयुक्तांची पोस्ट शेअर करत कौतुकास्पद कमेंट्स दिल्या आहेत. प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) झी मराठीवरती रात्री 9.30 वा हा कार्यक्रम पाहता येईल.

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचा झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात अनेक मोठे हस्ती उपस्थिती लावत असतात. नुकतेच या कार्यक्रमात आमदार रोहीत पवार, पंकजा मुंडे आणि प्रणिती शिंदे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आमंत्रित पाहुण्यांना प्रशांत दामले सांगतील तो पदार्थ बनवून द्यायचा असतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता संकर्षण क-हाडे करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.