Chakrashwar Temple : शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त चक्रेश्वर मंदिरात आकर्षक फुल सजावट

एमपीसी न्यूज : चाकण येथील पुरातन शिव मंदिरात आज शेवटच्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत मंदिर गाभाऱ्यात आकर्षक अशी फुल सजावट करण्यात आली होती. ती फुल सजावट पाहण्यासाठी व चक्रेश्वर (Chakrashwar Temple) महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

Wakad Crime: कॉंगो देशातील महिलेस दिल्लीतून अटक, वाकड पोलिसांची कारवाई

आज गाभाऱ्यातील फुल सजावटीमुळे या मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश नसल्याने, नंदीकेश्वरापासून बाहेरूनच बेलपत्र, फुल, शिव भाविकांनी चक्रेश्वर महाराजांना वाहिली. यावेळेस येथे भाविकांसाठी प्रसाद म्हणून उपवासाचे पदार्थ शिवभक्तांकडून वाटण्यात येत होते. हे पुरातन शिव मंदिर असल्याने श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीस येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. दशरथ राजाच्या रथाच्या एका चाकाविषयीची येथील एक कथा प्रसिद्ध आहे. येथील पुजारी त्या विषयी माहिती सांगत असतात. तसेच, 12 वर्ष वनवास व 1 वर्षाच्या अज्ञातवासाच्या दरम्याना पांडव चाकण (एकचक्रा नगरी) येथे काही दिवस वास्तव्यास होते, असे सांगितले (Chakrashwar Temple) जाते. येथे शांडिल्य ऋषींचीही समाधी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.