Rohit Pawar : आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंच्या आधी रोहित पवार अयोध्येत

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांच्या अयोध्या दौऱ्याची सध्या चर्चा सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आगामी काही दिवसात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचीच चर्चा सुरू आहे. मात्र या दोघांच्याही आधी आमदार रोहित पवार यांनी अयोध्या गाठली आहे. ते सध्या सहकुटुंब तीर्थयात्रेला गेले आहेत. 

रोहित पवार यांनी शुक्रवारी राजस्थान मधल्या राधा गोविंद मंदिराला भेट दिली. या मंदिराचं आणि भारतीय संस्कृतीच कौतुक त्यांनी आपल्या सोशल मीडियावर केले आहे. त्याशिवाय पुष्करचं ब्रह्मा मंदिर, सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चूस्ती यांचा अजमेर दर्गा या ठिकाणी ही रोहित पवार यांनी भेट दिली. या दोन्ही ठिकाणी आपण देशाच्या आणि राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान मागील चार दिवसांपासून राजस्थान दौऱ्यावर असलेले रोहित पवार उत्तर प्रदेश दौऱ्यावर निघाले आहेत. आज ते आपल्या कुटुंबियांसह अयोध्येत दाखल होतील आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.