Bhavana short film – ‘भावना’ लघुपटाला दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज : रॉयल सोसायटी ऑफ टेलिव्हिजन व मोशन पिक्चर्स आवार्ड या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने ‘वर्किंग वूमन’ या विषयावर आधारित असलेल्या बहुचर्चित ‘भावना’ (Bhavana short film) लघुपटला ‘बेस्ट वूमन शॉर्टफिल्म’ म्हणून पुरस्कार जाहीर झाला. 
९ जानेवारी २०२२ रोजी हा लघुपट ‘रेडबड मोशन पिक्चर्स’ या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला. रेडबड मोशन पिक्चर निर्मित हा लघुपट आहे. सीए अरविंद भोसले यांनी या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि स्क्रीनप्ले केले. तर, संपादन पिंपरी चिंचवडमधील एपीएच स्टुडिओच्या डायरेक्टर व अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांनी केले आहे.

 

गोल्डन ईगल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये देखील या लघुपटाला ‘बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म’ हा पुरस्कार मिळाला. तर, भारताच्या सर्वात मोठ्या असलेल्या सीएसआर या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ‘भावना’ (Bhavana short film) लघुपटाला नामांकन मिळाले होते. या संस्थेच्या वतीने ‘भावना’ लघुपटाचे दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांना पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती यांचे प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले.
या शॉर्ट फिल्मच्या केंद्रस्थानी काम करणाऱ्या महिला आहेत. त्यांना रोजच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न अरविंद भोसले यांनी केला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत महिला काम करतात. किचन, ऑफिस, मुलांचे संगोपन, घरातील जबाबदाऱ्या या प्रत्येक बाबतीत महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. महिला सशक्तीकरणाचा एक चांगला सामाजिक संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.

या लघुपटाची (Bhavana short film) निर्मिती युवराज तावरे, मनोज गायकवाड, विलास जेऊरकर, अजय पुजारी यांनी केली आहे. सहनिर्माते सतीश लिंगाडे आहेत. मुख्य कलाकार म्हणून अभिनेत्री पिया कोसुंबकर यांनी काम केले आहे. तर, सह कलाकार म्हणून पूजा वाघ, प्रसाद खैरे, रोहित पवार, धनंजय नारखेडे, चिराग चौधरी, सेजल गायकवाड, बालकलाकार अर्णव चावक यांनी काम केले आहे.
सीए अरविंद भोसले म्हणाले की, ‘भावना’ हा माझा चौथा लघुपट आहे. यावपूर्वी एडिक्शन वर्सेस अटॅचमेंट, बायकॉट ट्रेस, आय ओपनर, हे सामजिक संदेश देणारे लघुपट बनविले आहेत. ‘भावना’ या सामाजिक लघुपटाला दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद होत असल्याची ‘भावना’ त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.