Bhosari News: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणाला रिक्षात बसवले. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले. ही घटना 28 नोव्हेंबर रोजी पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडली.

सुरज वासूदेव बोदडे (वय 29, रा. तळेगाव चौक, चाकण) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरजोतसिंग इंद्रजितसिंग चौहाण (वय 19, रा. नेहरूनगर, पिंपरी) आणि त्याच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरजोतसिंग याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आरोपी चौहाण याने फिर्यादी बोदडे यांना भोसरीतील अंकुशराव चव्हाण नाट्यगृहाजवळ रिक्षातून लिफ्ट दिली. काही अंतर गेल्यावर फिर्यादी बोदडे यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्‍कम, मोबाइल आणि चांदीची अंगठी असा एकूण सात हजार रुपये किंमतीचा ऐवज काढून घेतला. ‘आमची पोलिसात तक्रार केली तर तुला सोडणार नाही’, अशी धमकीही आरोपी चौहाण याने दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.