Dighi : डिव्हायडरला धडकल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. सोमवारी (दि.२२) दुपारी साडेबाराच्या सुमारास वडमुखवाडी परिसरात हा अपघात झाला.

शशिकांत सुरेश वैरागर (वय ३०, रा. वैरागर चाळ, भोसरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.

वैरागर हे सोमवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवरून चऱ्होली परिसरातून जात होते. वडमुखवाडी येथे आले असता भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावरील डिव्हायडरला धडकले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.