Maval News : मावळ राष्ट्रवादीचा तालुक्यात झंझावात; भाजपसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचा झंझावात सुरु आहे. विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत. राष्ट्रवादी सोबत आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मावळ तालुक्याचा विकास करायचा असल्याचे राष्ट्रवादीचे तालुक्याचे पदाधिकारी विश्वास देत आहेत. त्यामुळे नुकताच भाजपला सोडचिट्ठी देऊन नाणे मावळ, पवन मावळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तसेच काँग्रेस पक्षातील काही कार्यकर्त्यांनी देखील हातावर घड्याळ बांधले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या पुढाकाराने मुंबई येथील प्रदेश कार्यालयात गुरुवारी (दि.७) पक्ष प्रवेश झाला. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील आदि. मान्यवर तसेच मावळ तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाजपा सहकार आघाडी मावळ अध्यक्ष अमोल सुरेश केदारी, माजी सरपंच शिवली बाळासाहेब आडकर, दिनकर आडकर, सामाजिक कार्यकर्ते अरुण आडकर, मावळ तालुका काँग्रेस पक्ष प्रवक्ता फिरोज शेख, शाम विकारी, संतोष ढाकोळ, रोशन केदारी, मंगेश केदारी, संतोष येवले, विशाल येवले, रोहित विकारी, राकेश केदारी, संकेत केदारी, उमेश येवले, आदेश केदारी, अक्षय केदारी, विशाल केदारी, सौरव केदारी, अमित सपकाळ, विकी हेंद्रे, विलास कांबळे, नितीन गोणते, सुहास शिंदे, अजय गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मागील 30 वर्षे राजकीय क्षेत्रात काम करत असताना मावळ मतदार संघात पक्षाला विजय मिळवता आला नाही; मात्र सुनिल शेळके यांच्यामुळे पक्षाला या जागेवर प्रचंड मतांनी विजय मिळवता आला. जनतेने आपल्याला मत देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण केली. आता आपल्याला विकास कामे करुन आपली जबाबदारी पार पाडायची आहे. सर्वांनी मिळून तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करुया.’ असे आवाहन पवार यांनी यावेळी केले तसेच पक्ष प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.