Maharashtra Political Crisis : मी पुन्हा येणार…! सत्तास्थापनेसाठी भाजप सज्ज, देवेंद्र फडणवीस बनणार मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – राज्यातील बंडखोरीच्या नाट्यमय घडामोडीनंतर (Maharashtra Political Crisis)  अखेर उद्धव ठाकरे यांनी काल (दि. 30 जून) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केला. 36 दिवसांत बनलेले हे महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षे चालले आणि केवळ नऊ दिवसांतच कोसळले. या सगळ्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मविआ सरकार कोसळ्याचे कळताच भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. दरम्यान संख्याबळाअभावी मविआ सरकार कोसळ्याने भाजप पुन्हा सत्तेत बसणार असून ‘मी पुन्हा येणार..’ अशी गर्जना करून जनतेला आश्वासन देणारे देवेंद्र फडणवीस दोन – तीन दिवसांतच पुन्हा शपथविधी करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

राज्यात राजकीय वादळ (Maharashtra Political Crisis)  सुरू असताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीवारी करत होते. दिल्लीवारी करून पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून त्यांनी एक दिवस आधी राज्यपालांची तातडीने भेट घेतली आणि बहुमत सिद्धीचे पत्र राज्यपाल कोश्यारी यांना दिले. भाजपच्या पत्रानंतर तात्काळ त्यावर अंमलबजावणी करत राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आणि यासाठी एक विशेष अधिवेशन 30 जून ला घेणार असल्याचे पत्रात नमूद केले. मविआ सरकार संख्याबळ नसल्यामुळे आधीच संकटात सापडले होते त्यामुळे हे पत्र मिळाल्यानंतर शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी तात्काळ सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

दरम्यान, काल रात्री 9 वाजता सर्वोच्च न्यायालयाने यावर तातडीचा निकाल देत राज्यपालांनी दिलेल्या निर्देशावर कायम राहत बहुमत सिद्धसाठी विशेष अधिवेशनाला परवानगी दिली, ज्यामध्ये मविआ सरकारला शिरगणतीद्वारे आपले बहुमत सिद्ध करावे लागणार होते. सलग नऊ दिवस घडणाऱ्या बंडखोरांच्या नाट्यमय घडामोडी, भाजपच्या गोटातील खळबळी, सर्वोच्च न्यायलयाचा निकाल आणि राज्यातील बंडखोरांबाबतचा असंतोष या सगळ्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्ह करून जनतेशी संवाद साधला आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

Maharashtra Political Crises : पुण्याला मंत्रिपद मिळणार? ठाकरे सरकार कोसळताच भाजप आमदारांचे मंत्रिपदासाठी लॉबिंग

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना पेढे भरवत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान मविआ सरकार कोसळल्यानंतर आज भाजप विधीमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेची रणनीती निश्चित केली जाणार आहे. विधीमंडळ पक्षनेत्याची सुद्धा आज निवड केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर पुढील दोन – तीन दिवसांत सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याची शक्यता आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असणाऱ्या सत्तांतराच्या नाट्यावर (Maharashtra Political Crisis)  अखेर पडदा पडला असून राज्यातील राजकारण एका वेगळ्या दिशेला जात असल्याच्या सूर सगळीकडून उमटत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.