Vadgaon Maval News : स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे भूषण मुथा यांची निवड

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष भूषण सुभाषचंद्र मुथा यांची निवड करण्यात आली. भाजपाचे स्वीकृत नगरसेवक रवींद्र काकडे यांनी पक्षांतर्गंत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडे भूषण मुथा यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.

पीठासन अधिकारी तथा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ढोरे यांनी भूषण मुथा यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

या वेळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणुन काम पाहिले. यावेळी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा शारदा ढोरे, नगरसेवक राजेन्द्र कुडे, चंद्रजित वाघमारे, राहुल ढोरे, सुनील ढोरे, माया चव्हाण, पूजा वहिले, पूनम जाधव, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, भाजपाचे गटनेते दिनेश ढोरे, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर,  प्रवीण चव्हाण, सुनीता भिलारे, दीपाली मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, सभापती ज्योती शिंदे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,  माजी आमदार दिगंबर  भेगडे, भारतीय जनता पार्टी, अल्प संख्याक जैन प्रदोष प्रदेशाचे अध्यक्ष संदीप भंडारी, मावळ भाजपचे अध्यक्ष  रवींद्र भेगडे, माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, महिला अध्यक्षा सायली बोत्रे, लोणावळा नगरसेविका बिंद्राताई गणात्रा, माजी उपसभापती शांताराम कदम, वडगाव शहर भाजपाचेअध्यक्ष अनंता कुडे, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, तालुका सरचिटणीस वैशाली ढोरे,  माजी अध्यक्ष नारायण ढोरे, सोमनाथ काळे, यदुनाथ चोरघे, माजी नगरसेवक ॲड विजय जाधव, शामराव ढोरे, प्रसाद पिंगळे, रवींद्र काकडे, युवा अध्यक्ष विनायक भेगडे, महिला अध्यक्ष धनश्री भोंडवे, रमेश ढोरे, किरण भिलारे आदी उपस्थित होते.

निवडीनतंर वडगाव शहरात विजयी मिरवणूक काढण्यात या प्रसंगी  मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी  वडगाव शहरातील आतापर्यंतचे भाजपातील  निष्ठावंत व क्रियाशील, पक्षासाठी योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांनाच संधी देण्यात येत असून  येणा-या उर्वरित काळात निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.