Pune News : शिक्षण मंडळातील रोजंदारीवरील 96 सेवकांना मिळणार बोनस

एमपीसी न्यूज – शिक्षण मंडळातील रोजंदारीवरील 96 सेवकांना बोनस आणि सानुग्रह अनुदान देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

रासने म्हणाले, बोनस मिळण्यासाठी सेवकांना 174 दिवस काम करणे बंधनकारक असते. परंतु या वर्षी कोरोनामुळे या सेवकांना कामावर रुजू करुन घेण्यासाठी प्रशासनाकडून विलंब झाल्याने त्यांचे 174 दिवस पूर्ण भरू शकले नाहीत. मात्र कोरोना काळात या कर्मचार्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंतर्गत त्यांना दिलेली कामे आणीबाणीच्या स्थितीतही योग्य पद्धतीने पार पाडली. या बाबीचा सकारात्मक विचार करुन 96 कर्मचार्यांना बोनस आणि सानुग्रह अनुदान देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.