Pune News : सुरक्षा रक्षकानेच केली घरफोडी, 25 तोळे दागिने नेले चोरून

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोहगाव परिसरातून घरफोडीचा एक प्रकार उघडकीस आलाय. ज्यामध्ये सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सुरक्षारक्षकाने फ्लॅट फोडून जबरी चोरी केली होती. या चोरट्यांनी तब्बल 25 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते परंतु विमानतळ पोलिसांनी चोरीचा हा गुन्हा उघडकीस आणला असून या चोरट्यासह तिघांना अटक केले. यामध्ये एका सोनाराचाही समावेश आहे. 

संतोष उर्फ लारा काशिनाथ जाधव (वय 35) त्याचा साथीदार संतोष उर्फ रोखी अरुण धनवजिर (वय 34) आणि चोरीचे सोने खरेदी करणारा होणार अशोक गणेशलाल जानी (वय 54) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीचे 20 तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी सौरभ कुंदन यांनी तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहगाव येथील न्याती एविता या उच्चभ्रू सोसायटीत फिर्यादी राहतात. डिसेंबर रोजी ते कुटुंबीयां सोबत कात्रज या ठिकाणी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांचा फ्लॅट फोडत पंचवीस तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना आरोपी संतोष जाधव याने घरफोडी केल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने आणखी एका साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी एका सोनारासह तिघांना याप्रकरणात अटक केली. आरोपी संतोष जाधव हा पूर्वीच्या सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.