Vilas Madigeri : विविध सामाजिक उपक्रमांनी विलास मडिगेरी यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार

एमपीसी न्यूज –  श्री साई चौक मित्र मंडळ आणि विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान (Vilas Madigeri) इंद्रायणीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, अंध मुलांना अन्नधान्य वाटप इ. उपक्रम राबविण्यात आले.

विलास मडिगेरी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा कऱण्यात आला. या निमित्ताने इंद्रायणीनगर येथील वैष्णवी देवी मंदिराजवळ आय़ोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, पोलिस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात 187 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी डॉ. डी. वाय. पाटीलद्वारा संचलित ब्लडबँक व वाय. सी. एम. हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले.

PCMC News: गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यास आता मुदतवाढ नाही

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने उद्योजक चंद्रकांत देशमुख व्यंकटराव शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. तसेच, पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंधशाळेमध्ये विदयार्थ्याना अन्नधान्य वाटप करण्यता आले. 50 किलो रवा व 50 किलो पोहे, तसेच 5 हजार रुपये मदतनिधी देण्यात आला. यशवंतराव चव्हाण आश्रम शाळेत 75 किलो पोहे व 75 किलो रवा, चिंचवडच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला 50 किलो रवा व 50 किलो पोहे शिवाय 10 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली.

इंद्रायणीनगरमधील (Vilas Madigeri) महापालिका वैष्णोमाता प्राथमिक शाळेतील 600 मुलांना खाऊ व बिस्कीट वाटप करण्यात आले. 10 वी व 12 वीच्या 60 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार कऱण्यात आला. जवळजवळ 215 विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व पॉवर बँक आणि ट्रॉफी बक्षिस देण्यात आले.

Fire Fighting’ System : ‘फायर फायटिंग’ यंत्रणेची देखभाल; 47 लाखांचा खर्च

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे,  आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे बंधु शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या आमदार महेश लांडगे यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे बंधु कार्तिक लांडगे, सचिन लांडगे, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर केशव घोळवे, प्रदेश कोशाध्यक्ष शैला मोळक, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नाना राऊत, चंद्रकांत देशमुख, संतोष कलाटे, नवीन लैगुडे, माऊली जगताप, रामदास कस्पटे आदी उपस्थित होते.

आमदार उमा खापरे व शंकरशेठ जगताप यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांना भविष्यामध्ये अशीच प्रगती करुन देशसेवा व समाजसेवा घडावी, असे मार्गदर्शन केले. श्री. साई चौक मित्र मंडळ, विलासभाऊ यांचे सर्व मित्रमंडळी यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. उपस्थितांचे आभार धनंजय जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.