Vadgaon Maval News : ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या वतीने वडगाव मावळचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. काकडा आरती, भजनी मंडळाच्या भजनातून राम जन्माचा अभंग व प्रभु श्रीराम जन्माचा पाळणा म्हणून हा जन्मोत्सव साजरा केला.

श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरमध्ये रामनवमी निमित्ताने, प्रभू श्रीराम जन्म उत्सव साजरा करण्यात आला,यावेळी काकडा आरती,भजनी मंडळाने, भजनातून जन्माचा अभंग व प्रभु श्रीराम जन्माचा पाळणा म्हणून या कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे,विश्वस्त किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ॲड. अशोक ढमाले,ॲड.तुकाराम काटे,अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे,सुभाषराव जाधव, सुनिता कुडे आदीसह, विणेकरी बबन भिलारे,शंकर म्हाळसकर,राघूजी कुडे, विठ्ठल ढोरे,मधुकर पानसरे, शिवाजी होणावळे, बाळासाहेब नवघणे, पुजारी मधुकर गुरव आदिंसह महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.