Chakan : जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग; आरोपीची पतीसही मारहाण

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग करून मध्यस्थी केलेल्या पतीसही आरोपीने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. २९) रात्री पावणे दहाच्या सुमारास खेड तालुक्यातील संतोषनगर भाम येथे घडली.

नितीन अशोक कड (रा. संतोषनगर भाम, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास फिर्यादी महिला घरात एकटी होती. याचा फायदा घेत आरोपी नितीन याने फिर्यादी महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. आरोपी नितीन याने फिर्यादी महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. यावेळी महिलेचे पती घरी आले.

महिलेच्या पतीने हा प्रकार पाहिला असता त्यांनी आरोपी नितीनला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नितीन याने महिलेच्या पतीच्या डोक्यात काठीने मारून गंभीर दुखापत केली. तसेच तुला उद्या बघून घेतो, अशी धमकी देऊन आरोपी नितीन घरातून निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.