Crime News : चाकण वाहतूक पोलिसाला लाच घेताना अटक

एमपीसी न्यूज – कारवाई  न करता गाडी परत देण्यासाठी 7 हजाराची लाच स्वीकारताना चाकण वाहतूक पोलिसाला मंगळवारी (दि.6) रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

चाकण वाहतूक विभागातील पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब अंबादास जायभाय  (वय 32) व खासगी मदतनीस किशोर भगवान चौगुले (वय 43) अशी अटक आरोपींची नवे आहेत.या प्रकरणी 22 वर्षीय तरुणाने तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण वाहतूक विभागाने कारवाईसाठी तक्रारदार यांची दुचाकी ताब्यात घेतली होती. कारवाई न करता दुचाकी देण्यासाठी जायभाय याने 10 हजार रुपयांची मागणी केली.तडजोडी अंती 7 हजार देण्याचे ठरले.ही 7 हजार रुपयांची लाच घेताना पोलिसांनी जायभय व त्याचा मदनिस चौगुले याला अटक केली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यावेळी सापळा अधिकारी व तपास अधिकारी म्हणून सहायक पोलिस आयुक्त शीतल घोगरे या काम पहात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.