Chandrayaan 3 : जागतिक चांद्र दिनी चांद्रयान 3 चा पृथ्वीच्या पाचव्या कक्षेत प्रवेश

एमपीसी न्यूज : चांद्रयान टप्प्याटप्प्याने चंद्राच्या जवळ (Chandrayaan 3) जात असून आज यानाने पृथ्वीजवळील अखेरच्या कक्षेत प्रवेश केला आहे. हे यान आता लवकरच चंद्राच्या पहिल्या कक्षेच्या दिशेने त्याच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे इस्रोची चंद्रयान 3 मोहिम सुरु असतानाच, आज जागतिक चांद्र दिनाचा योग जुळून आला आहे.

 

इस्रोने जारी केलेल्या माहितीनुसार चंद्रयान 3 ने आज दुपारी पुन्हा प्रज्वलन करून पृथ्वीच्या 5 व्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला आहे (20 जुलै). आता येत्या मंगळवारी दुपारी 2 ते 3 यावेळेत ‘चांद्र हस्तांतरण प्रक्षेपण’ (Lunar Transfer Trajectory) म्हणजेच हे यान चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचविण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे (25 जुलै).

 

आजच्याच दिवशी अमेरिकेच्या अपोलो 11 मोहिमेत चंद्रावर मानवाचे चंद्रावर पहिले पाऊल पडले होते. यानिमित्त दर वर्षी 20 जुलै ला जागतिक चांद्र दिन साजरा केला जातो.

Pune : दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

चंद्रयान 3 मोहिमेचा आत्तापर्यंतचा घटनाक्रम :

1. 14 जुलै – चंद्रयान 3 चे प्रक्षेपण व पृथ्वीच्या पहिल्या कक्षेत यशस्वी प्रवेश

2. 15 जुलै – चंद्रयान 3 चा दुसऱ्या कक्षेत प्रवेश

3. 17 जुलै – यान तिसऱ्या कक्षेत पोहोचले

4. 18 जुलै – यान पृथ्वीच्या चौथ्या कक्षेत पोहोचले

5. 20 जुलै – चंद्रयान 3 पृथ्वीच्या 5 व्या आणि शेवटच्या कक्षेत पोहोचले.

 

गेल्या मंगळवारी (18 जुलै) चंद्रयान 3 ने पृथ्वीपासून 51400 किमी x 228 किमी अंतरावर ठरल्याप्रमाणे प्रज्वलनाने चौथ्या कक्षेत प्रवेश केला होता. आता येत्या मंगळवारी (25 जुलै) हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी पृथ्वीची कक्षा सोडून प्रस्थान करणार आहे.

हा या मोहिमेतील एक महत्वाचा व आव्हानात्मक टप्पा मानला जात आहे. जगातील काही मोजकेच देश चंद्राजवळ आपले अवकाशयान पोहोचविण्यात यशस्वी झाले आहेत. त्यात भारताचाही समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.