Chikhali News: कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी येणा-या युवकांचे गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन स्वागत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 15 ते 18 वयोगटातील युवकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाले आहे. युवकांना को-वॅक्‍सीन लस देण्यात येत आहे. म्हेत्रेवाडी येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या युवक, युवतींना गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.

माजी सत्तारुढ पक्षनेते, नगरसेवक एकनाथ पवार, लसीकरण केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी डॉ. रामनाथ बच्छाव, नगरसेवक कुंदन गायकवाड, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, योगिता नागरगोजे, साधना मळेकर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश मळेकर, माणिक म्हेत्रे, महादेव कवितके, डॉ. प्रणाली स्वामी, परिचारिका रेखा पंचांगे, आम्रपाली कांबळे, डाटाएन्ट्री ऑपरेटर अश्‍विनी राजपूत, अकाश शिंदे, मदतनीस श्‍वेता पोटफोडे, सुनीता टिपरे उपस्थित होते.

कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत आहे. लस हे मोठे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे प्रभागातील 15 ते 18 या वयोगटातील पात्र युवकांनी आपली ऑनलाइन नोंदणी करून लस घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. रामनाथ बच्छाव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.