Chinchwad Bye-Election : शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडीतून उमेदवारी डावलल्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Chinchwad Bye-Election) वाकडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेवून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर कलाटे यांनी मोरया गोसावी महाराज यांचे दर्शन घेतले.

थेरगाव येथील ग प्रभाग कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप, माजी नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेविका मीनल यादव, अश्विनी वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.

Pimple-Gurav News : परस्पर बँक खात्यातून अडीच लाख ट्रान्सफर

महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि शिवसेनेचे राहुल कलाटे ही दोन नाव सुरुवातीपासून चर्चेत होती. (Chinchwad Bye-Election) राहुल कलाटे यांचे नाव आघाडीवर होते. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. वाकड येथून मोठी रॅली काढत कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.