Pimpri News : आचार्य अत्रे सभागृहातून महिलेची पर्स चोरीला

एमपीसी न्यूज – संत तुकाराम नगर पिंपरी येथील आचार्य अत्रे (Pimpri News) सभागृहात आलेल्या एका महिलेची पर्स अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी घडली.

याप्रकरणी महिलेने अज्ञात इसमाच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad Bye-Election : शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने त्यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, 50 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन हजार रुपये रोख रक्कम पर्समध्ये ठेवली होती.(Pimpri News) रविवारी दुपारी पावणे तीन वाजता अवघ्या तीन मिनिटांमध्ये अज्ञात व्यक्तीने त्यांची पर्स चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.