Chinchwad News: चिंचवड परिसरात दोन ठिकाणी आग

एमपीसी न्यूज – चिंचवड परिसरातील थेरगाव आणि आनंदनगर येथे गुरुवारी (दि. 3) आग लागल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पहिली घटना थेरगाव येथील स्विच कॉलनीमध्ये घडली. मध्यरात्री दोन वाजता प्रशांत दुबे यांनी कॉलनीमध्ये एका घराला आग लागल्याची माहिती दिली. स्विच कॉलनीमधील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.

दुसरी घटना आनंदनगर, चिंचवड स्टेशन येथे घडली. गुरुवारी दुपारी 12 वाजता सुभाष डोईफोडे यांनी आग लागल्याची अग्निशमन विभागाला माहिती दिली. आनंदनगर येथील एका घरातील सर्वजण कामासाठी गेले होते. घरी 12 वर्षांचा एक मुलगा होता. मात्र आग लागण्यापूर्वी तो देखील खेळण्यासाठी बाहेर गेला होता. घरातून धूर येत असल्याचे दिसल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. जवानांनी आगीवर काही वेळेत नियंत्रण मिळवले. या आगीचे देखील कारण समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.