-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chinchwad : मास्क न वापरल्यास होणार कठोर कारवाई

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे आदेश गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मास्क वापरणे हेदेखील अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाच्या वतीने दिलेल्या सूचनांचे, निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 नुसार, साथीचे रोग कायदा 1897 तसेच प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

काय आहे या आदेशात

# सर्व व्यक्तींना कोणत्याही कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी (रस्ता, हॉस्पिटल, कार्यालय, बाजारपेठ) तीन पदरी मास्क अथवा कापडी मास्क वापरणे अनिवार्य आहे.

# कोणत्याही व्यक्तीला त्याच्या खासगी अथवा शासकीय वाहनाने वाहतूक किंवा प्रवास करत असताना मास्क परिधान करणे अनिवार्य आहे.

# कोणत्याही व्यक्तीला वाहन चालविताना तसेच त्याच्या कोणत्याही कामाच्या ठिकाणी किंवा त्याच्या कार्यालयात तसेच कोणत्याही ठिकाणी काम करताना वरील उल्लेख केल्याप्रमाणे मास्क परिधान करणे आवश्यक आहे.

# कोणीही व्यक्ती किंवा अधिकारी-कर्मचारी कोणत्याही बैठकीस कार्यक्रमास तसेच कामाच्या ठिकाणी विना मास्क उपस्थित राहणार नाही.

# वापरण्यात येणारे मास्क हे केमिस्ट दुकानातील प्रमाणबद्ध असावेत. अथवा घरगुती बनविलेले आणि चांगले धूवून निर्जंतुकीकरण करून फेर वापरण्यायोग्य असावेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn