Corona World Update: जगातील 60 टक्के रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई!

Corona World Update: 60% of patients worldwide win Corona battle! एकूण 1 कोटी 46 लाखांपैकी 87 लाख रुग्ण कोरोनामुक्त, जगात सुमारे 53 लाख सक्रिय कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – जगातील सुमारे एक कोटी 46 लाख कोरोनाबाधितांपैकी 87 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी 59.66 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कोरोना बळींचा आकडा सहा लाखांच्या पुढे गेला असला तरी कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 4.16 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 36.18 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. काल (रविवारी) जगभरात 2 लाख 20 हजार नवीन कोरोना रुग्णांची भर पडली तर 1 लाख 23 हजारपेक्षा अधिक कोरोनामुक्त झाले. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 46 लाख 40 हजार 349 झाली असून आतापर्यंत एकूण 6 लाख 08 हजार 856 (4.16 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 87 लाख 34 हजार 789 (59.66 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 52 लाख 96 हजार 704 (36.18 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 52 लाख 36 हजार 889 (98.87 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 59 हजार 815 (1.13 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

13 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 95 हजार 878,  कोरोनामुक्त 1 लाख 13 हजार 919, मृतांची संख्या 3 हजार 731

14 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 16 हजार 806, कोरोनामुक्त 1 लाख 50 हजार 025, मृतांची संख्या 5 हजार 346

15 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 34 हजार 302, कोरोनामुक्त 1 लाख 89 हजार 633, मृतांची संख्या 5 हजार 755

16 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 48 हजार 914, कोरोनामुक्त 2 लाख 41 हजार 335, मृतांची संख्या 5 हजार 741

17 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 40 हजार 681, कोरोनामुक्त 1 लाख 76 हजार 369, मृतांची संख्या 5 हजार 583

18 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 24 हजार 065, कोरोनामुक्त 1 लाख 51 हजार 019, मृतांची संख्या 5 हजार 008

19 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 20 हजार 073, कोरोनामुक्त 1 लाख 23 हजार 557, मृतांची संख्या 4 हजार 316

अमेरिकेत रविवारी 65 हजार 279 नवे कोरोना रुग्ण

अमेरिकेत रविवारी 65 हजार 279 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38 लाख 98 हजार 550 झाली आहे. रविवारी अमेरिकेत 412 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 1 लाख 43 हजार 289 पर्यंत वाढला आहे. अमेरिकेत 18 लाख 02 हजार 338 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून अमेरिकेत 19 लाख 52 हजार 923 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमधील रविवारी 716 कोरोनाबाधितांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये रविवारी 716 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा 79 हजार 533 वर पोहचला आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख 99 हजार 896 झाली असून त्यापैकी 13 लाख 71 हजार 229 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता ब्राझीलमध्ये 6 लाख 49 हजार 134 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 38,310 वर

मेक्सिकोत रविवारी 578 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 38 हजार 888 झाला आहे. मेक्सिकोतील कोरोना संसर्ग आता 3 लाख 38 हजार 913 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 2 लाख 13 हजार 006 रुग्ण बरे झाले असून 87 हजार 019 रुग्ण सक्रिय आहेत.

भारतात रविवारी 675 कोरोना बळी

भारतात रविवारी 675 कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली. कोलंबियात 220, इराणमध्ये 209, पेरूमध्ये 189, इंडोनेशियात 127 तर किरगिझस्तान 103 कोरोना बळी गेले. रशियात 95, इराकमध्ये 90, दक्षिण अफ्रिका 85, चिली व फिलिपाइन्समध्ये प्रत्येकी 58 तर बोलिवियामध्ये 57 कोरोना मृत्यू नोंदविले गेले.

बांगलादेश 16 व्या स्थानावर

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत जर्मनीला मागे टाकत बांगलादेश 16 व्या स्थानावर गेला आहे. जर्मनी आता 17 व्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 38,98,550 (+65,279), मृत 1,43,289 (+412)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 20,99,896 (+24,650), मृत 79,533 (+716)
  3. भारत – कोरोनाबाधित 11,18,107 (+40,243) , मृत 27,503 (+675)
  4. रशिया – कोरोनाबाधित 7,71,546 (+6,109), मृत 12,342 (+95)
  5. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 3,64,328 (+13,449), मृत 5,033 (+85)
  6. पेरू – कोरोनाबाधित 3,53,590 (+4,090), मृत 13,187 (+189)
  7. मेक्सिको – कोरोनाबाधित 3,38,913 (+7,615), मृत 38,888 (+578)
  8. चिली – कोरोनाबाधित 3,30,930 (+2,084), मृत 8,503 (+58)
  9. स्पेन –  कोरोनाबाधित 3,07,335 (+0), मृत 28,420 (+0)
  10. इंग्लंड – कोरोनाबाधित 2,94,792 (+726), मृत 45,300 (+27)
  11. इराणकोरोनाबाधित 2,73,788 (+2,182), मृत 14,188 (+209)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,63,496 (+1,580), मृत 5,568 (+46)
  13. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,50,920 (+2,504), मृत 2,486 (+39)
  14. इटली – कोरोनाबाधित 2,44,434 (+218), मृत 35,045 (+3)
  15. टर्की – कोरोनाबाधित 2,19,641 (+924) मृत 5,491 (+16)
  16. बांगलादेशकोरोनाबाधित 2,04,525 (+2,459), मृत 2,618 (+37)
  17. जर्मनी – कोरोनाबाधित 2,02,845 (+273), मृत 9,163 (+1)
  18. कोलंबिया – कोरोनाबाधित 1,97,278 (+6,578), मृत 6,736 (+220)
  19. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,74,674 (+0), मृत 30,152 (+0)
  20. अर्जेंटिना –  कोरोनाबाधित 1,26,755 (+4,231), मृत 2,260 (+40)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.