Corona World Update: कोरोनामुक्तांचे प्रमाण 52 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 42.65 टक्के

Corona World Update: Corona free 52% and active patients 42.65% जगातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 81 लाखांच्या पुढे गेला असला तरी त्यापैकी 42 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 81 लाखांच्या पुढे गेला असला तरी त्यापैकी 42 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी आणखी वाढून 51.93 टक्के झाली आहे. आता जगात सुमारे 34.60 लाख सक्रिय कोरोनाबाधित उरले आहेत. कोरोनाबाधितांचे आणि मृतांचे आकडे वाढत असले तरी जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.41 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 42.65 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 81 लाख 12 हजार 613 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 39 हजार 051 (5.41 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 42 लाख 13 हजार 226 (51.93 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 34 लाख 60 हजार 336 (42.65 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 34 हजार 05 हजार 766(98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 54 हजार 570 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

8 जून – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 270,  कोरोनामुक्त 75 हजार 280, मृतांची संख्या 3 हजार 157

9 जून – नवे रुग्ण 1 लाख 21 हजार 071,  कोरोनामुक्त 66 हजार 534, मृतांची संख्या 4 हजार 732

10 जून – नवे रुग्ण 1 लाख 34 हजार 705,  कोरोनामुक्त 1 लाख 31 हजार 298, मृतांची संख्या 5 हजार 165

11 जून – नवे रुग्ण 1 लाख 36 हजार 757,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 127, मृतांची संख्या 4 हजार 951

12 जून – नवे रुग्ण 1 लाख 40 हजार 917,  कोरोनामुक्त 86 हजार 241, मृतांची संख्या 4 हजार 603

13 जून – नवे रुग्ण 1 लाख 33 हजार 292,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 371, मृतांची संख्या 4 हजार 229

14 जून – नवे रुग्ण 1 लाख 23 हजार 783,  कोरोनामुक्त 71 हजार 423, मृतांची संख्या 3 हजार 258

15 जून – नवे रुग्ण 1 लाख 24 हजार 600,  कोरोनामुक्त 90 हजार 756, मृतांची संख्या 3 हजार 415

अमेरिकेतील 8.89 लाख कोरोनामुक्त

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (सोमवारी) 20,722 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 21 लाख 82 हजार 950 झाली आहे. सोमवारी 425 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 18 हजार 283 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 8 लाख 89 हजार 866 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

ब्राझीलमध्ये एका दिवसात 843 कोरोना बळी 

ब्राझीलमध्ये सोमवारी 729 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 44 हजार 118 वर जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 8 लाख 91 हजार 556 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 4 लाख 53 हजार 568 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 93 हजार 870 आहे.

भारतात सोमवारी 395 कोरोना बळी

भारतात सोमवारी एका दिवसात 395 कोरोना बळींची नोंद झाली आहे. मेक्सिकोत 269 पेरूमध्ये 172, रशियात 143 तर इराणमध्ये 113 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान व इजिप्त प्रत्येकी 97, दक्षिण अफ्रिकेत 88,  इंडोनेशिया व कॅमेरूनमध्ये प्रत्येकी 64, कोलंबियात 59 बळी गेले आहेत.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 21,82,950 (20,722), मृत 118,283 (+425)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 8,91,556 (+23,674), मृत 44,118 (+729)
  3. रशिया – कोरोनाबाधित 5,37,210 (+8,246), मृत 7,091 (+143)
  4. भारत – कोरोनाबाधित 3,43,026 (+10,243) , मृत 9,915 (+395)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 2,96,857 (+968), मृत 41,736 (+38)
  6. स्पेन – कोरोनाबाधित 2,91,189 (+181), मृत 27,136 (+0)
  7. इटली – कोरोनाबाधित 2,37,290 (+301), मृत 34,371 (+26)
  8. पेरू –  कोरोनाबाधित 2,32,992 (+3,256) , मृत 6,860 (+172)
  9. इराण – कोरोनाबाधित 1,89,876 (+2,449), मृत 8,950 (+113)
  10. जर्मनी – कोरोनाबाधित 1,88,044 (+373), मृत 8,885 (+15)
  11. टर्की – कोरोनाबाधित 1,79,831 (+1,592), मृत 4,825 (+18)
  12. चिली – कोरोनाबाधित 1,79,436 (+5,143), मृत 3,362 (+39)
  13. फ्रान्स – कोरोनाबाधित 157,372 (+152), मृत 29,436 (+29)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,46,837 (+4,147), मृत 17,141 (+269)
  15. पाकिस्तान – कोरोनाबाधित 1,44,478 (+5,248), मृत 2,729 (+97)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,32,048 (+4,507) मृत 1,011 (+39)
  17. कॅनडा –  कोरोनाबाधित 99,147 (+360), मृत 8,175 (+29)
  18. बांगलादेशकोरोनाबाधित 90,619 (+3,099), मृत 1,209 (+38)
  19. चीन – कोरोनाबाधित 83,181 (+49), मृत 4,634 (0)
  20. कतार – कोरोनाबाधित 80,876 (+1,274), मृत 76 (+3)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.