Corona World Update: शुक्रवारी सर्वाधिक 1.81 लाख नव्या रुग्णांची नोंद, त्याच काळात 1.11 लाख कोरोनामुक्त

Corona World Update: Highest 1.81 lakh new patients registered on Friday, 1.11 lakh corona free in the same period एकूण 87.5 लाखांपैकी 46.2 लाख कोरोनामुक्त, 4.6 लाख रुग्णांचा मृत्यू तर 36,68 लाख सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – जगात काल (शुक्रवारी) एका दिवसात तब्बल 1 लाख 81 हजार 005 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी 1 लाख 10 हजार 910 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे. जगातील  कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 87.5 लाखांच्या पुढे गेला असला तरी त्यापैकी 46.2 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी आणखी वाढून 52.80 टक्के झाली आहे. कोरोनाबाधितांचे आणि मृतांचे आकडे वाढत असले तरी जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.28 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 41.92 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी चिंताजनक रुग्णांचे प्रमाणही अर्धा टक्क्याने कमी होऊन दीड टक्क्यापर्यंत खाली आले आहे, ही दिलासा देणारी बाब आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 87 लाख 50 हजार 990 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 61 हजार 820 (5.28 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 46 लाख 20 हजार 378 (52.80 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 36 लाख 68 हजार 792 (41.92 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 36 लाख 15 हजार 455 (98.5 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 54 हजार 796 (1.5 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

13 जून – नवे रुग्ण 1 लाख 33 हजार 292,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 371, मृतांची संख्या 4 हजार 229

14 जून – नवे रुग्ण 1 लाख 23 हजार 783,  कोरोनामुक्त 71 हजार 423, मृतांची संख्या 3 हजार 258

15 जून – नवे रुग्ण 1 लाख 24 हजार 600,  कोरोनामुक्त 90 हजार 756, मृतांची संख्या 3 हजार 415

16 जून – नवे रुग्ण 1 लाख 42 हजार 557,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 806 , मृतांची संख्या 6 हजार 592

17 जून – नवे रुग्ण 1 लाख 41 हजार 872 ,  कोरोनामुक्त 1 लाख 08 हजार 580, मृतांची संख्या 5 हजार 264

18 जून – नवे रुग्ण 1 लाख 40 हजार 528 ,  कोरोनामुक्त 96 हजार 845 , मृतांची संख्या 5 हजार 123

19 जून – नवे रुग्ण 1 लाख 81 हजार 005 ,  कोरोनामुक्त 1 लाख 10 हजार 910 , मृतांची संख्या 5 हजार 066

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 23 लाखांच्या उंबरठ्यावर

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (शुक्रवारी) 33 हजार 539 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख 97 हजार 190 झाली आहे. शुक्रवारी 719 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 21 हजार 407 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 9 लाख56 हजार 061 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजून 12 लाख 19 हजार 722 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमधील कोरोना संसर्ग 10 लाखांच्या पुढे

ब्राझीलमध्ये शुक्रवारी 1,221 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 49 हजार 090 वर जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 10 लाख 38 हजार 568 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 5 लाख 20 हजार 360 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 69 हजार 118 आहे.

मेक्सिकोत शुक्रवारी 667 कोरोना बळी

मेक्सिकोत शुक्रवारी एका दिवसात 667 कोरोना बळींची नोंद झाली आहे. भारतात 366, चिलीमध्ये 252, पेरूमध्ये 199, रशियात 181 तर इंग्लंडमध्ये 173 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये 136, इराणमध्ये120, कोलंबिया 95, दक्षिण अफ्रिकेत 94, इजिप्त 79,  इक्वाडोर व इराकमध्ये प्रत्येकी 69 बळी गेले आहेत.

मेक्सिको 13 व्या तर दक्षिण अफ्रिका 19 व्या स्थानावर

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत मेक्सिकोने पाकिस्तानला मागे टाकत 13 व्या स्थानावर जाऊन पोहचला आहे तर कतारला मागे टाकत दक्षिण अफ्रिया 19 व्या स्थानावर पोहचला आहे. आता पाकिस्तान 14 व्या तर कतार 20 व्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 22,97,190 (+33,539), मृत 1,21,407 (+719)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 10,38,568 (+55,209), मृत 49,090 (+1,221)
  3. रशिया – कोरोनाबाधित 5,69,063 (+7,972), मृत 7,841 (+181)
  4. भारत – कोरोनाबाधित 3,95,812 (+14,721) , मृत 12,970 (+366)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 3,01,815 (+1,346), मृत 42,461 (+173)
  6. स्पेन – कोरोनाबाधित 2,92,655 (+307), मृत 28,315 (+0)
  7. पेरू –  कोरोनाबाधित 2,47,925 (+3,537) , मृत 7,660 (+199)
  8. इटली – कोरोनाबाधित 2,38,011 (+251), मृत 34,561 (+47)
  9. चिली – कोरोनाबाधित 2,31,393 (+6,290), मृत 4,093 (+252)
  10. इराण – कोरोनाबाधित 2,00,262 (+2,615), मृत 9,392 (+120)
  11. जर्मनी – कोरोनाबाधित 1,90,660 (+534), मृत 8,960 (+14)
  12. टर्की – कोरोनाबाधित 1,85,245 (+1,214), मृत 4,905 (+23)
  13. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,65,455 (+5,662), मृत 19,747 (+667)
  14. पाकिस्तान – कोरोनाबाधित 1,65,062 (+4,944), मृत 3,229 (+136)
  15. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,59,452 (+811), मृत 29,617 (+14)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,50,292  (+4,301) मृत 1,184 (+45)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,05,535 (+3,243), मृत 1,388 (+45)
  18. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,00,629 (+409), मृत 8,346 (+46)
  19. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 87,715 (+3,825), मृत 1,831 (+94)
  20. कतार – कोरोनाबाधित 85,462 (+1,021), मृत 93 (+7)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.