New year celebration : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर जमावबंदी लागू

एमपीसी न्यूज : नववर्षांच्या स्वागतासाठी (new year celebration) सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यातही (Pune) थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर नववर्ष स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पर्यटनस्थळी रात्र जमावबंदी आदेश जारी केला. शुक्रवार 25 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू राहणार आहे. पुणे ,पिंपरी चिंचवड या महापालिका क्षेत्रात रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी ग्रामीण भागात गर्दी होण्याची शक्यता आहे.

यामुळं एमटीडीसीच्या निवासस्थानांचे आरक्षण केलेल्या पर्यटकांचा मात्र हिरमोड होणार आहे. नववर्षाच्या निमित्ताने mtdc ची सर्व निवासस्थानांची आरक्षणे फुल्ल झाली आहेत. 31 डिसेंबरला या ठिकाणी सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. मात्र हे कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत.

तळेगाव दाभाडे, चाकण, आळंदी या नगरपरिषदांचा भाग,तळेगाव, चाकण midc,हिंजवडी आयटी पार्क तसंच लोणावळा,अॅम्बी व्हॅली, लवासा, भुशी डॅम, मुळशी धरण, ताम्हिणी घाट, सिंहगड रस्ता, खडकवासला या पर्यटनस्थळांसह मावळ, मुळशी आणि हवेली तालुके याशिवाय विविध फार्म हाऊस, निवासस्थाने(रिसॉर्ट्स ) या ठिकाणी रात्र जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा कोरेगाव भीमासह अकरा गावामध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 पर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.