_MPC_DIR_MPU_III

Chinchwad News : खुनाच्या प्रयत्नाच्या घटनांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत घट

अकरा महिन्यात 307च्या 61 घटना

एमपीसी न्यूज – मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी एकंदरीत गुन्ह्यांची आकडेवारी चार हजारांनी कमी झाली आहे. त्यात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे देखील कमी घडले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या अकरा महिन्यात 61 खुनाच्या प्रयत्नाच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षी हा आकडा 84 एवढा होता.

_MPC_DIR_MPU_IV

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च पासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नागरिकांना घराबाहेर पडण्यावर बंधने आली. विनाकारण घराबाहेर फिरणा-यास पोलीस काठीचा प्रसाद देत होते. त्यामुळे गुन्हेगारी मानसिकता देखील घरात कैद झाल्या. याचाच परिणाम गुन्हे दाखल होण्यावर झाला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांची आकडेवारी कमी आहे.

नोव्हेंबर महिन्यात 14 जणांवर खुनाचा प्रयत्न करण्यात आला. हेच प्रमाण नोव्हेंबर 2019 मध्ये दोन एवढे होते. टाळेबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर एप्रिल महिन्यात एकही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. एप्रिल महिन्यात एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणा-या एकाने महिलेची छेड काढली म्हणून नागरिकांनी त्याला चोप दिला. त्यात तो सुरक्षा रक्षक जखमी झाला. त्यानंतर उपचारासाठी तो नवी मुंबई येथे गेला आणि तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा एक खुनाचा प्रकार सांगवी परिसरात घडला.

किरकोळ भांडणे, तत्कालीन कारणे आणि जुन्या घटनांच्या रागातून मारहाण केली जाते. रागाच्या भरात समोरच्याला संपवून टाकण्याची मानसिकता तयार होते. त्यातून त्याच्यावर हल्ला केला जातो. असेच अनेक प्रकार शहरात घडत आहेत. काही प्रकरणे तर आरोपींच्या अंगलट सुद्धा आली आहेत. निगडी येथे भावाचा अपघात करून त्याला जाणीवपूर्वक मारले असल्याचा संशय घेऊन एकाने दारूच्या नशेत एकावर चाकूने हल्ला केला. चाकू पोटात जोरात लागला आणि जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

_MPC_DIR_MPU_II

केवळ घाबरवण्यासाठी केलेला हल्ला थेट खुनापर्यंत जाऊन पोहोचला. सुरुवातीला या प्रकरणात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर यात कलमवाढ करून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

मागील वर्षी जानेवारी, मार्च, मे, जून, ऑगस्ट या महिन्यात सर्वाधिक खुनाच्या घटना घडल्या. तर जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत 84 खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हा आकडा 23 ने कमी होऊन 61 एवढा झाला आहे.

खुनाच्या प्रयत्नाच्या घटना –
जानेवारी – 3
फेब्रुवारी – 13
मार्च – 4
एप्रिल – 1
मे – 9
जून – 3
जुलै – 2
ऑगस्ट – 4
सप्टेंबर – 2
ऑक्टोबर – 6
नोव्हेंबर – 14

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1