Talegaon News : आर्थिक फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यवसायासाठी जागा विकून त्याचे पैसे घेऊन ती जागा इतर लोकांना विकून एका व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केली. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत रवींद्र पंढरीनाथ काळोखे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्यानुसार नवनाथ दळवी आणि निवृत्ती काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काळोखे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, व्यवसायाच्या निमित्ताने काळोखे यांची नवनाथ दळवी आणि निवृत्ती काळे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी काळोखे यांना बांधकाम व्यवसायासाठी जागा दाखवली. त्या जागेपोटी काळोखे यांनी नवनाथ दळवी आणि निवृत्ती काळे यांना टप्पा पद्धतीने दहा लाख रुपये दिले.

पैसे घेऊन झाल्यानंतर ही मंडळी पुढील व्यवहारासाठी उपलब्ध झाली नाहीत. त्यानंतर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले. या कालावधीत नवनाथ दळवी आणि निवृत्ती काळे यांच्या नीतिमत्तेत बदल झाला. त्यांनी काळोखे यांना विकलेली संबंधित जागा त्रयस्थ व्यक्तीला विकली. यांनी अशा प्रकारे मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे जमीन विक्री केली असून याबाबत चौकशी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.