Pune News : कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधून साडेसात लाख रुग्णांचे निदान

एमपीसी न्यूज – शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांच्या संपर्कात येणार्‍यांची माहिती घेण्यासाठी (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) महापालिकेने नेमलेले मनुष्यबळ तोकडे पडत आहे. या कामासाठी महापालिकेकडे केवळ 51 कर्मचार्‍यांची 24 पथके आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात येणार्‍यांची माहिती संकलीत करताना चांगलीच दमछाक होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. याचाच एक भाग म्हणून प्रशासनाकडून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून योग्य त्या उपाय योजना केल्या जातात. या ट्रेसिंगमध्ये कोणाला थंडी, ताप, खोकला, सर्दी अथवा काही कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास त्याला चाचणी, क्वारंटाईन, विलगीकरण यासंदर्भात माहिती देऊन पुढील कार्यवाही केली जाते.

एका कोरोना रुग्णाच्या पाठीमागे हायरिस्क (जवळून संपर्कात आलेल्या) 5 आणि लो रिस्क (दूरून संपर्कात आलेल्या) 15 अशा 20 लोकांचा सर्वे करण्याचे धोरण निश्चित केले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून दिवसाला शहरातील कोविड बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी एका रुग्णामागे 20 लोकांचा सर्व्हे करणे आणि त्यातील हाय रिस्क लोकांच्या चाचण्या करून घेणे अश्यक्यप्राय होत आहे.

त्यातच या कामासाठी पूर्वी नेमलेले शिक्षक, पीएमपीएमएल कर्मचारी, अंगणवाडी सेविका हे कर्मचारी मूळ कामाच्या ठिकाणी गेल्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम घनकचरा वविभागातील कर्मचार्‍यांवर व नर्सवर अवलंबून आहे. या कामासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास 10 टिम नियुक्त करण्यात याव्यात, यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्य अधिकार्‍यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

7 हजार 696 कोरोना रुग्णांचे निदान –

शहराची लोकसंख्या सुमारे 35 लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी सुमारे 300 ते 400 कर्मचारऱ्यांची आवश्यकता आहे  असे असताना केवळ 51 कर्मचार्‍यांवर हे काम सुरू आहे. कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर 14 डिसेंबर 2021 ते 9 जानेवारी 2022 दरम्यान 3 लाख 21 हजार 968 नागरिकांची तपासणी केली. यापैकी 54 हजार 25 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 7 हजार 696 कोरोना बाधीत आढळून आल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.