Digvijay Singh : देवेंद्र फडणवीस यांना जाणून-बुजून उपमुख्यमंत्री पद, हा तर त्यांचा अपमान

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी नवीन सरकार आले आहे. सरकार स्थापनेच्या हालचाली होत असताना देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे सर्वांना वाटत होते. मात्र अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर चहूबाजूने टीका होत असताना काँग्रेस नेते दिग्विजय सिंग (Digvijay Singh) यांनी देखील फडणवीसांना टोला लगावला.
केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना जाणून-बुजून उपमुख्यमंत्री पद देत त्यांचा अपमान केला आहे. मी जर त्यांच्या जागी असतो, तर हे पद कधीच स्वीकारले नसते असे दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. दिग्विजय सिंग यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

ते म्हणाले महाराष्ट्रात आता जो खेळ सुरू आहे तो काही देशाला नवीन नाही. 2017 पासून पैशाच्या जोरावर असे खेळ सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय जनता पक्षाचा लोकशाही आणि भारतीय संविधानावर विश्वास नाही. महाराष्ट्रात पक्षांतर बंदी कायद्याच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. धर्माचा वापर हा राजकीय हत्यार म्हणून केला जात आहे. ज्या ज्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार आहे त्यांच्यासोबत पूर्णपणे पक्षपाती भूमिका घेतली जात आहे. देशात आता लोकतंत्र नाही तर धनतंत्र असल्याची टीका दिग्विजय सिंग यांनी केली.
गोव्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर देखील त्यांनी जोरदार टीका केली. गोवा काँग्रेसचे जे काही नेते भाजपसोबत गेले आहेत त्यांच्यापैकी किती जणांच्या मागे ईडीसी चौकशी सुरू होती याची माहिती घ्यावी लागेल असे म्हणत त्यांनी भाजपला (Digvijay Singh) टोला लगावला आहे.

Supriya Sule : सरकार विमानात फिरतंय, हॉटेलात बसतंय आणि अडीच हजाराची दाढी करतंय

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.