India Corona Update : गेल्या 24 तासांत 20,652 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. 20 हजार 652 बरे झालेल्या रुग्णांना गेल्या 24 तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे मागील 24 तासांत 17 हजार 921 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 12 लाख 62 हजार 707 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 09 लाख 20 हजार 046 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 84 हजार 598 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 22 कोटी 34 लाख 79 हजार 877 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 63 हजार 081 चाचण्या मंगळवारी (दि. 09) रोजी करण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत देशात 133 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 58 हजार 063 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.41 टक्के एवढा आहे‌. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.95 टक्के एवढं झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.