Alandi Crime News : डॉक्टरने केला महिला रुग्णाचा विनयभंग

एमपीसी न्यूज – तपासण्याच्या बहाण्याने एका डॉक्टरने महिला रुग्णासोबत अश्लील वर्तन करत रुग्णाचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी आळंदी येथील प्रबोध निसर्ग उपचार केंद्र येथे घडली.

डॉ. गंगाधर नानासाहेब वाघे (वय 41, रा. स्वामी समर्थ नगर, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. वाघे आळंदी येथील प्रबोध निसर्ग उपचार केंद्र हा आयुर्वेदिक दवाखाना चालवतात. शनिवारी सकाळी फिर्यादी महिला आरोपीच्या दवाखान्यात गेल्या. डॉ. वाघे यांनी फिर्यादी महिलेचे पोट तपासण्याच्या बहाण्याने महिलेसोबत अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर डॉक्टरने पीडित महिलेला दमदाटी केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.